मालेगाव /महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांचे अधिपत्याखाली दि.०७/०६/२०२३ रोजी दुपारी १.०० वा. मा.आयुक्त यांचे परिषद दालनात सन २०२३ मधील संभाव्य पुर परिस्थितीच्या आपत्कालीन व्यवस्थेच्या नियोजनासाठी सुकाणु समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रथमत: आपत्ती व्यवस्थापन सुकाणु समितीचे सचिव तथा मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी मालेगाव महानगरपालिकेचे संभाव्य आपत्तीस सामोरे जाण्या करीता मालेगाव महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना बाबत सादरीकरण केले.तसेच मा.आयुक्त तथा प्रशासक यांनी सन २०२३ मधील संभाव्य पुर परिस्थितीच्या आपत्कालीन व्यवस्थेच्या नियोजनासाठी मालेगाव महानगरपालिकेमार्फत आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्यात आलेला असुन पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास अथवा चणकापुर व हरणबारी धरणातुन जास्त प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्यास संभाव्य पुर परिस्थिती निर्माण होत असते. त्याअनुषंगाने मालेगाव शहरातील १८ धोकेदायक ठिकाणे असुन जेथे पुर पाणी आल्यास नुकसान होवु शकते याकरीता १८ धोकेदायक ठिकाणांवरील राहणार्याम नागरिकांना मामनपातर्फे १५ ठिकाणी निवास व भोजन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पोलीस प्रशासनास तत्पर राहणेकामी सुचना करण्यात आल्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनपा तर्फे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आलेला असुन त्याचा संपर्क क्रमांक ०२५५४ – २३१९५० असा आहे. तसेच आपात्कालीन परिस्थीत मालेगाव महानगरपालिका व म.शासनाचे सर्व संबंधित विभाग जसे की, पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, महसुल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, नगर भुमापन विभाग,महावितरण विभाग या सर्व विभागांनी समन्वयाने कामकाज करुन भविष्यातील आपत्तीस सामोर जाणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या विविध उपाययोजना व व कामांबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना केल्यात.
या आढावा बैठकीस मनपाचे उपायुक्त राजु खैरनार, तहसिलदार नितीन देवरे, शहर अभियंता कैलास बच्छाव, प्रमुख अग्निशमन अधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय पवार, सहा.आयुक्त सचिन महाले, अनिल पारखे, हरिष डिंबर, श्याम बुरकुल, आरोग्याधिकारी डॉ.जयश्री आहेर, नगरसचिव साजिद अन्सारी, पोलीस निरिक्षक विकास देवरे, एस.आर.पाटील, पंडितराव सोनवणे, सहा.पोलीस निरिक्षक प्रकाश काळे, डी.ए.पाटील, व्ही गोपाल, जगदिश बोरसे, गौतम तायडे, सहा.मोटार वाहन निरिक्षक सोमनाथ घोलप, उपकार्यकारी अभियंता आर.एस.निकम, आर. व्ही. कासार सा.बां.वि., प्र.व.जोशी पाटबंधारे विभाग, सुनंदा पाटील नगर भुमापन विभाग, अंतर्गत लेखापरिक्षक शेखर वैद्य, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी जगदिश बडगुजर, अब्दुल कदिर अ.लतीफ, उपअभियंता शांताराम चौरे, सचिन माळवाळ, विद्युत अधिक्षक अभिजीत पवार, आस्थापना पर्यवेक्षक मो.तौसिफ शेख, अतिक्रमण अधिक्षक शाम कांबळे, सहा.आरोग्याधिकारी डॉ.ऋषिकेश सांळुके, प्रमुख स्वच्छता निरिक्षक आंनदसिंग पाटील, उद्यान अधिक्षक निलेश पाटील, सहा.सुरक्षा अधिकारी पी.आर.खलचे, नगररचना विभागाचे लिपीक पंकज देवरे, नगरसचिव विभागाचे कर्मचारी उदय आहिरे व आदी कर्मचारी उपस्थित होते.


