مشہور خبریں

मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई : घटनेच्या 24 तासांत संशयित अबू बकर, मोहम्मद शाहबाज आणि वसीम शाह यांना अटक, रिक्षासह तीन लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 


मालेगाव / मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमाप, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती तसेच मा. सहायक पोलीस अधीक्षक, श्री. तेगबीर सिंह संधू मालेगांव शहर उपविभाग, यांचे मार्गदर्शना खाली रमजानपुरा पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. आशिष रोही व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देवरे तसेच रमजानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पो.हवा. १२२९ दिपक खैरनार, पो. हवा. २०४५ रणजित राठोड, पो. हवा. ११४३ राजेन्द्र व्हलगडे, पो.ना. १८५६ कुणाल शिंदे, पो. ना. २६१४ गणेश कुमावत, पो.कॉ. ३०५१ अरुण बडे यांनी रमजानपुरा पोलीस ठाणेकडील दि. ३०/०७/२०२३ रोजी दाखल गु.र.नं. १२२ / २०२३ भा.दं.वि. कलम ४५७, ४५४, ३८० प्रमाणे गुन्हयातील अज्ञात आरोपीचा व गेले मालाचा शोध घेवुन ईसम नामे- १) अबुबकर निहाल अहमद, वय २८ वर्षे, रा. नवकिरण सायजिंगचे पाठीमागे, रमजानपुरा, मालेगांव २) मोहम्मद शहबाज मोहम्मद अबु बकर, वय ३२ वर्षे, रा. गौतम नगर, गल्ली नं. ३, द्याने, मालेगांव ३) वसीम शहा अकील शहा, वय २५ वर्षे, रा. गौतम नगर, द्याने शिवार, कुसुंबा रोड, मालेगांव

यांना शिताफीने गुन्हा घडल्यानंतर २४ तासांचे आत पकडुन त्यांचे कडुन घरफोडी चोरी करून नेलेला १,०८,०००/- रू. किं. ये तयार कापडाचे ६० तागे व गुन्हयात वापरलेली निळ्या रंगाची अॅपे रिक्षा क. MH-04 GF-3664 २,००,००० रु. किंमत असलेली असा एकुण ३,०८,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला असुन सदर आरोपीतांची ०३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देवरे हे करीत आहेत.

Tags

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.