مشہور خبریں

शरपूर पोलीस ठाण्याचे उत्तम पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांची मोठी कारवाई, सुगंधी तंबाखू , आयसर वाहनसह 44 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

 


शिरपूर : ( जनता समाचार न्यूज नेटवर्क ) शिरपूर शहर पो.स्टे. चे पोनि आगरकर सो यांना दि. २६/०४/२०२३ रोजी १४.४५ वाजेचे सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडून शिरपुरकडे आयसर वाहन क्र.एच.आर.४६/ ई.१९६९ असे वाहन येत असुन त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी तंबाखुचा माल भरलेला आहे.

त्यानुसार पोनि आगरकर सो यांनी डी. बी. पथकाचे पोहेकॉ / ललीत पाटील यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पोहेकॉ / ललीत पाटील यांनी डी. बी. पथकासह चोपडा फाटा, कळमसरे शिवार ता. शिरपूर जि. धुळे येथे पंचांसह सापळा लावला असता राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ने इंदौरकडुन शिरपूरकडे येणारे आयसर वाहन क्र. एच. आर. ४६ ई. १९६० असे १५.३० वाजेचे सुमारास शिताफीने पकडले असता सदर वाहनावरील चालक अशोक आजादसिंग बडख वय-३४ रा. बाळंद ता.जि. रोहतक राज्य हरियाणा हा सदर वाहनात मोबाईल टॉवरचे मालाचे आडोशास २४,००,०००/- रु.कि.चो सुगंधीत तंबाकू माल भरलेले पांढ-या रंगाचे पुठुयाचे ४० खोके नेतांना मिळुन आल्याने सदरचा माल महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असल्याने सदर मालासह २०,००,०००/- रू. किं.चे आयसर वाहन क्र. एच. आर. ४६ / ई.१९६९ सह एकूण ४४,००,०००/- रू. कि. चा मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांना पत्रव्यवहार केल्यानुसार किशोर हिम्मतराव बावीस्कर अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांनी शिरपूर शहर पो.स्टे.ला येवून वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती सरकारतर्फे फिर्याद होवुन अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम २६ (२) (iv), २७ (३) (d), ३० (२) (a). ३ (१) (22) (1) (१) (zz.) (v) चे उल्लंघन केलेले असुन ५९ (i) अन्वये तसेच भादंवि कलम १८८. २७२, २७३ व ३२८ अन्वये गुन्हा दाखल करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदर गुन्ह्यात आरोपी नामे अशोक आजादसिंग बडख वय ३४ रा. बाळंद ता. जि. रोहतक राज्य हरियाणा यास अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोनि आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि/गणेश कुटे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली श्री. ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, पोउनि / गणेश कुटे, संदिप मुरकुटे, तसेच डी. बी. पथकाचे पोहेकॉ / ललीत पाटील, लादूराम चौधरी, पोना/मनोज पाटील, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रविण गोसावी, सचिन वाघ, भटु साळुंके, तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.




Tags

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.