मालेगाव / ( जनता समाचार ) नाशिक ग्रामीण जिल्हयात मा. पोलीस अधीक्षक सो श्री. शहाजी उमाप यांनी मालेगाव शहरात बेकायदेशीर विनापरवाना अवैध हत्यार बाळगणारे विक्री तसेच अवैध रित्या मांस विक्री करणारे यांचेवर कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश झाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक सो मालेगाव श्री.अनिकेत भारती व सहा. पोलीस अधीक्षक सो श्री तेगबीर सिंग संधू यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि पवारवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दरेगांव शिवारात सुनीया हन्यीया मदरसा जवळ इसम नामे आमिन गोल्डन याने त्याचे फार्महाऊस मधील पत्र्याच्या खोलीमध्ये कपाटात एक देशी कट्टा व कोयता ठेवला असुन व त्या ठिकाणी काहि इसम हे हरणांचे मास कापत आहेत बाबत खात्रीशीर बातमी मिळाली आहे. तेथे जावून कायदेशिर कारवाई करणे कामी पो. निरीक्षक पाटोल सो यांनी पशुवैदयकिय अधिकारी मालेगांव श्री जावेद खाटीक व फॉरेस्ट विभागाचे कांतीलाल बाळके व अतुल देवरे यांना सोबत घेवून पवारवाडीचे सहा. पो. निरी. श्री ज्ञानेश्वर बडगुजर, पो.हवा. सचिन धारणकर, पो. हवा. राकेश उबाळे, पो. हवा. विनायक जगताप, पो.ना. सचिन गोसावी, पो.ना. संतोष सांगळे
पो.ना. भरत गांगुर्डे, पो.कॉ. नवनाथ शेलार, पो. कॉ. उमेश खेरनार अशांनी सदर घटनास्थळी ३ इसमांना जागीच पकडले असता त्यांनी त्यांची नावे १) शेख शब्बीर शेख रज्जाक ऊर्फ आला वय ४५ वर्षे रा. ग.नं. ४, घर नं. ८३१, कमालपुरा, मालेगांव २) शोकत हुसेन निसार अहमद वय-४४ वर्षे रा. सर्वे नं. १७, घर नं. १०८, मोमीनपुरा, मालेगांव ३) दानिश शेख अश्पाक वय २२ वर्षे, रा. ग.नं. ३, घर नं. ३३२, आयेशानगर मालेगांव असे असल्याचे सांगितले. पो. निरी. पाटील यांनी तेथे पडलेले मांस कशाचे आहे बाबत विचारले असता त्यांनी ते मांस हरणांचे असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांना किती हरणांचे मास आहे बाबत विचारले असता त्यांनी ३ मादी व ३ नर असे एकुण ६ हरणांचे मांस सर्व मिळुन १२० किलो असल्याचे सांगितले. शेख शब्बीर शेख रज्जाक ऊर्फ आला याने सांगितले कि, फार्महाऊस हे मोहमद अमिन मोहमद हारुन अन्सारी रा.
कमालपुरा मालेगांव यांचे आहे व हरणे हे १) मोहमद अमिन मोहमद हारुन अन्सारी. (फरार) २) मुदस्सीर अकिल अहमद रा. बेलबाग मालेगांव ( फरार ) यांनी आणुन दिली आहेत. बाबत सांगितले. सदर घटनास्थळी मिळुन आलेल्या ६ हरणांचे एकुण १२० किलो मांस बनावटीची पिस्टल बंदुक १ बंदुकिची गोळी १९ लोखंडी कोयता १ राखाडी रंगाची होंडा शाहिन १ गावठी मोटारसायकल बिना नंबर प्लेटची असा एकुण २,५२,१०० /- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील हे करत आहे.



