मालेगाव : (जनता समाचार) किल्ला पोलीस ठाणेस सी. सी. टी. एन. एस । गु.र.न.८१/२०२३ भा.द.वि. कलम ३८०, ३४ प्रमाणे दिनांक २३/०५/२०२३ रोजी २३/५० वाजता दाखल झाला असुन त्यातील फिर्यादी नामे नटवरलाल शिवरतन वर्मा वय ५५ धंदा ज्वेलर्स दुकान रा. बुरुड गल्ली बालाजी मंदीराचे पाठीमागे मालेगांव यांच्या मोहनपीर गल्ली येथील मे.वर्मा गोल्ड या सराफ दुकानातून तीन बुरखाधारी महीलांनी सोन्याच्या फुल्या दाखविण्याच्या बहाण्याने एकुण १५२ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या फुल्यांचा बॉक्स त्या महिलानी हात चलाखीने चोरी करुन घेवुन गेले म्हणुन गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाच्या तपासात मा. पोलीस अधिक्षक सो नाशिक ग्रामिण श्री. शहाजी उमाप, मा. अपर पोलीस अधिक्षक मालेगांव श्री अनिकेत भारती, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीपकुमार जाधव कॅम्प उपविभाग मालेगांव, याचे मार्गदर्शनानुसार किल्ला पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री गौतम तायडे, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, पो.हवा / १०६३ पाटील, पो.शि. / १२५ भोये, पो. शि/ २१९६ निकाळे, पो.शि./१७१९ भामेर, मपोना / २५५३ जगताप, मपोशि/मते, मपोशि/अहिरे, मपो. हवा. / बागुल यांनी सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासुन १२ तासाच्या आत सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयित महीला याची ओळख पटविली असता त्या शोध घेतला असता त्या मालेगांव शहरातील असल्याचे दिसुन आल्याने त्यांची गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन त्याचा शोध घेतला असता त्या १) साजेदाबानो उर्फ अन्नु बशिर खान वय ४० वर्षे रा. एक्बाल डाँबी कुंसुबा रोड मालेगांव
२) ताहेरा उर्फ आशिया खुर्शिद अहमद वय २५ वर्षे रा. ताजपंजन चौक मालेगांव ३) नाजिया शेख इस्माईल वय ३० वर्षे रा. स. नं. ५५ कौसिया कॉलनी मालेगांव अशा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या राहत्या घरी जावुन शोध घेतला त्या मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आली व त्याचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या दागिण्यापैकी एकुण ६ तोळे १ ग्रॅम वजनाच्या नाकातील सोन्याच्या फुल्यां एकुण किमत ३,०५,०००/ रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले असुन सदर महीला आरोपी यांच्याकडे पुढील तपास करीत आहोत.


