मालेगाव / मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण श्री . शहाजी उमाप तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव श्री. अनिकेत भारती, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगांव शहर उपविभाग यांनी व त्यांचे विशेष पथकातील उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पो.कॉ. दिनेश शेरावते तसेच पवारवाडी पोलीस ठाणे कडिल पोनिरी. एस.बी. पाटील, पोहवा.शिंदे, पोहवा. धारणकर, पोहवा. उबाळे, पोना. सांगळे, पोकॉ. चव्हाण, पोकॉ. खैरनार यांनी केलेली छापा कारवाई .
दि.२५/०५/२०२३ रोजी १९.३० वा. श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगांव शहर उपविभाग यांना गुप्तबातमी मिळाली की, दरेगांव शिवारात शाही गोल्डन हॉटेलच्या जवळ, इसम नामे जुनेद डोंग्या व त्याचा मित्र आफताफ कुरेशी उर्फ राजा चोर असे नशा कारक औषध अंमली पदार्थ एम.डी. व कुत्ता गोली विक्री करित आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने वर नमुद पोलीस स्टाफ यांनी सर्व कायदेशीर कार्यवाही पुर्ण करून मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून छापा कारवाई केली असता तेथे १) जुनैद मोहम्मद चाउस, रा. निहालनगर, मालेगांव यास ताब्यात घेण्यात आले व अंधाराचा फायदा घेवुन २) आफताब कुरेशी उर्फ राजा चोर पुर्ण नांव पत्ता माहिती नाही (फरार) हा पळुन गेला.
ताब्यात असलेला इसम नामे जुनैद डोंग्या याची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे २१,८१४/- रू. किं.च्या Alprozolam टॅबलेट्सच्या एकुण ७७ गोळया (कुत्ता गोळया) तसेच ८.६५ ग्रॅम वजनाचे सफेद रंगाचे दानेदार मफेड्रिन (M.D.) नशा कारक अंमली पदार्थ मिळुन आल्याने सदर प्रकाराबाबत पवारवाडी पो.स्टे. येथे सीसीटीएनएस गुरनं. १११/२०२३ भादविकाक ३२८, २७६, ३४ व गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS अॅक्ट) १९८५ चे कलम २२ सह १९८५ चे कलम ८(क), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


