مشہور خبریں

शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई : भोला छाप सुगंधीत तम्बाखुचा ५० कार्टुण आणि 20 लाख रुपयांच्या आयसर ट्रकसह 39 लाख 74 हजार किमतीचा माल जप्त, चालक अटक

 


शिरपूर :  शिरपूर शहर पो.स्टे. चे पोनि आगरकर सो यांना दि. २७/०५/२०२३ रोजी रात्री २.१५ वाजेचे सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ने इंदौरकडुन शिरपूरकडे आयसर वाहन क्र. यू.पी. ५३/ इ.टी.०२४९ असे वाहन येत असुन त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी तम्बाखुचा माल भरलेला आहे.


त्यानुसार पोनि आगरकर सो यांनी पोसई/संदिप मुरकुटे यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पोसई/संदिप मुरकुटे यांनी डी. बी. पथकासह शहादा फाटा, कळमसरे शिवार ता. शिरपूर जि. धुळे येथे पंचांसह सापळा लावला असता राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ने इंदौरकडुन शिरपूरकडे येणारे आयसर वाहन क्र. यू.पी. ५३/ इ.टी.०२४१ असे ३.०० वाजेचे सुमारास शिताफीने पकडले असता सदर वाहनावरील चालक जमाल अली अहमद वय ४८ रा. नारायचा जाफरगंज ता. बिडकी जि.फतेहपुर हासवा राज्य उत्तर प्रदेश हा सदर वाहनात प्लॅस्टीक फिल्म मालाचे आडोशास १९,७४,०००/- रू. किं.ची भोला छाप सुगंधीत तम्बाखुचा माल भरलेले पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीक गोणटी असलेले ९ कार्टुन व पांढ-या रंगाचे प्लॅस्टीक गोणटी असलेले ४१ कार्टुण असे एकूण ५० कार्टुण नेतांना मिळुन आल्याने सदरचा माल महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधीत असल्याने सदर मालासह २०,००,०००/- रू. किं.चे आयसर वाहन क्र. यु.पी. ५३ / इ.टी. ०२४१ सह एकुण ३९,७४,०००/- रू. किं.चा मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांना पत्रव्यवहार केल्यानुसार अन्न व सुरक्षा अधिकारीनी शिरपूर शहर पो.स्टे. ला येवून वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती सरकारतर्फे फिर्यादी होवून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.


सदर गुन्ह्यात आरोपी नामे जमाल अली अहमद वय ४८ रा. नारायचा जाफरगंज ता. बिडकी जि. फतेहपुर हासवा राज्य उत्तर प्रदेश यास अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली श्री.ए.एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, पोउनि / संदिप मुरकुटे, तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉलनीत पाटील, लादूराम चौधरी, पोना/मनोज पाटील, पोक योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंके, प्रविण गोसावी तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.

Tags

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.