مشہور خبریں

महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि लिपिक नितीन जोशी यांना 55 हजार रुपयांची लाच घेताना अटक

 


नाशिक / निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५५ हजारांची लाच मागणाऱ्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागाचे लिपिक नितीन जोशी यांना एसीबीने  लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

यामुळे नाशिक महानगरपालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल ५५ हजारांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली आहे. धनगर यांना ताब्यात घेतले असून सध्या त्यांची एसीबीकडून चौकशी सुरु करण्यात आली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.



एका निलंबित मुख्याध्यापकाला कामावर पुन्हा रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी सुनीता धनगर (57, रा. 801 रचित सनशाइन उंटवाडी नाशिक (वर्ग-२) आणि नितीन जोशी (45, रा. फ्लॅट नंबर ८, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक (वर्ग -३) यांनी दोघांनी एकूण ५५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. शिक्षणाधिकारी धनगर या ५० हजार रुपये आणि लिपिक जोशी हे ५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

Tags

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.