مشہور خبریں

मालेगाव पोलिसांची कारवाई : गोवंश जातीचे जनावर , पिकअप वाहनासह 2 ,78,000 रुपयांची मालमत्ता जप्त, तौसिफ खानवर गुन्हा दाखल

 


मालेगांव /दि.१३/०६/२०२३ रोजी ०५.०० वा. श्री. तेगवीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगांव शहर उपविभाग यांना गुप्त बातमी मिळाली की, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गुलाब पार्क मध्ये तौसिफ खान हमिद खान उर्फ तौसिफ कांती रा.गुलाब पार्क पाण्याच्या टाकी जवळ मालेगांव हा गोवंश जातीचे जनावरे पिकअप गाडी क्र. एम.एच.०४ डी.एस. ५६८८ हिच्या मध्ये विनापरवाना बेकायदा कत्तल करण्यासाठी गोवंश जातीचे जनावरे वाहतुक करून आणत आहेत. अशी खात्रीशिर बातमी मिळालेवरून त्यांचे विशेष पथकातील तसेच पवारवाडी पोलीस ठाणे कडिल वर नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार अश्यांनी सदर वाहनाचा शोध घेवून छापा कारवाई केली असता गुलाब पार्क पाण्याच्या टाकी जवळ इसम नामे तौसिफ खान हमिद खान उर्फ तौसिफ कांती, वय - ३०, राहणार गुलाब पार्क पाण्याच्या टाकी जवळ मालेगांव हा गोवंश जनावरांची वाहतुक करून स्वतःचे फायदयासाठी गोवंश हत्या बंदी असतांना विनापरवाना बेकायदेशीर रित्या ०८ गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या इरद्याने पिकअप गाडी क्र. एम.एच.०४ डी. एस. ५६८८ यात वाहतुक करतांना मिळुन आला असुन सदर कारवाईत एकुण २,७८,००० /- रू. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकाराबाबत पवारवाडी पोलीस ठाणे येथे सीसीटीएनएस गुरनं. १३५ / २०२३ महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) विधेयक १९९५ चे कलम ५(ब) चे उल्लंघन कलम ९ सह प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ सह मो.वा. का. क.८३, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमाप तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव श्री.अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगांव शहर उपविभाग यांनी व त्यांचे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पो. कॉ. दिनेश शेरावते, पोकॉ. सचिन बेदाडे तसेच पवारवाडी पो.स्टे.कडिल पोहवा.धारणकर, पोहवा. भामरे, पोना. गांगुर्डे, पोकॉ. शेलार यांनी केलेली छापा कार्यवाही .

Tags

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.