मालेगाव :- मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात *“बेटी बचाओ बेटी पढाओ”* अभियानांतर्गत गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे व स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींचे प्रमाण वाढविणे करिता मालेगाव महानगरपालिका संचलित गुरुवार वार्ड नागरी आरोग्य केंद्र व डायमंड गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने मा. आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मा.अति आयुक्त नुतन खाडे, मा.उपायुक्त महिला व बालकल्याण अधिकारी पल्लवी शिरसाठ, आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर, RCHO ऑफिसर डॉ. अलका भावसार, गुरुवार वार्ड ना.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आसेफा मुख्तार अहमद व कर्मचारी तसेच डायमंड गर्ल्स हायस्कूल मधील विद्यार्थिनी यांनी दिनांक 31/07/2024 रोजी गुरुवार वार्ड नागरी आरोग्य केंद्र येथून मालेगाव महानगरपालिका मालेगाव मुख्य कार्यालय पर्यंत रॅली काढण्यात आली तसेच रॅली दरम्यान *“बेटी बचाओ बेटी पढाओ”* असे आकर्षक पोस्टर व घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
तरी वरील विषयान्वये मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरीकांना *“बेटी बचाओ बेटी पढाओ”* अभियानांतर्गत गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्याकरिता व स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींचे प्रमाण वाढविणे करिता रॅली द्वारे करण्यात आलेले मालेगाव शहरातील नागरिकांना मा.आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव , मालेगाव मनपा मालेगाव यांचे वतीने जाहिर आवाहन करणेत येत आहे. डॉ. जयश्री आहेर आरोग्याधिकारी मालेगाव महानगरपालिका मालेगाव ۔