مشہور خبریں

मालेगांव Dysp तेगबीर सिंह संधूची मोठी कारवाई : एम डी ड्रग्ज आणि मारुती कारसह ११ लाख २४ हजार ४८० रुपयांची मुद्देमाल जप्त , अतिक बम्बैया अटक

 


मालेगांव / मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण श्री. शहाजी उमाप तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव श्री.अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगांव शहर उपविभाग यांनी व त्यांचे विशेष पथकातील उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पो. कॉ. दिनेश शेरावते तसेच पोनिरी. एस. बी. पाटील, सपोनिरी. आशिष रोही, सहा. फौजदार सुरेश मोरे, पोहवा. भामरे, पोना. गांगुर्डे, पोना. गोसावी, पोकॉ. राठोड यांनी केलेली छापा कारवाई.


दि. १९/०६/२०२३ रोजी १३.३५ वा. श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगांव शहर उपविभाग यांना गुप्तबातमी मिळाली की, इसम नामे अतिक अहमद सलीमुद्दीन शेख, रा. मालेगांव हा संवदगांव फाटा येथे नाशाकारक अंमली पदार्थ एम. डी. विक्री करण्याचे उददेशाने येणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाली असुन वर नमुद पोलीस अधिकारी/अंमलदार यांना छापा कारवाईचे आदेश दिले असता त्यांनी सर्व कायदेशीर कार्यवाही पुर्ण करून मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून छापा कारवाई केली


असता सवंदगांव फाटा मालेगांव येथे इसम नामे अतिक अहमद सलीमुद्दीन शेख, उर्फ अतिक बम्बैया, वय ४५ वर्ष, रा. घर नं. २६५, गल्ली नं. ०२, सर्वे नं. १०६ / ७ गुलशेर नगर मालेगांव हा विना परवाना, बेकायदा मानवी मनावर विपरीत पनिरणाम करणा-या नशाकारक अंमली पदार्थ त्यात सफेद रंगाची ३१.१९ ग्रॅम एम. डी. पावडर व तांबुस रंगाची ३१.०५ ग्रॅम एम. डी. पावडर ही मारूती सुझुकी कपंनीची ब्रेझा कार क्र. एम. एच. ४६ ए.यु. ०७५२ हिच्या सह मिळुन आल्या असुन सदर कारवाईत एकुण ११,२४,४८०/-रु. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकाराबाबत पवारवाडी पोलीस ठाणे येथे सीसीटीएनएस गुरनं. १४३/२०२३ गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS अॅक्ट) १९८५ चे कलम २०, २२ (c) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.