कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई : मालेगांव शहरात चोरी केलेल्या 1,50,000 रुपये किमंतीच्या 7 मोटार सायकल जप्त , एका इसमांस ताब्यात
0
جولائی 30, 2024
मालेगांव / मा. पोलीस अधिक्षक श्री विक्रम देशमाने साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अनिकेत भारती सो. तसेच मालेगांव कॅम्प सहा. पोलीस अधिक्षक श्री सुरज गुंजाळ तसेच मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे कडील दाखल गु.र.नं.184/2024 भारतीय न्याय संहीता चे कलम 303,(2) प्रमाणे दिनांक 29/07/2024 रोजी या गुन्हयाचा तपास चालु असताना दिनांक 29/07/2024 रोजी घटनास्थळावरुन सि.सी.टी.व्ही फुटेज मध्ये दिसणा-या इसमाचा शोध घेतला असता इसमनामे प्रमोद दिलीप बच्छाव वय-35 वर्षे राह-रोकडोबा नगर, दाभाडी मालेगांव हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यानेच गुन्हयातील हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल ही चोरी केल्याची माहीती मिळाल्याने त्यास पोलीस ठाणे येथे आणुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने मालेगांव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन 07 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन दाखल गुन्हयातील 01 हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस मोटार सायकल व इतर 04 हिरो होन्डा स्पलेन्डर प्लस मोटार सायकल व 01 बजाज प्लॅटीना मोटार सायकल, 01 एच.एफ.डिलक्स अश्या एकुण 07 मोटार सायकल 1,50,000/-रुपये किमतीच्या हस्तगत करण्यात आल्या असुन मिळालेल्या मोटार सायकल हया सदर इसमाने मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे, मालेगांव शहर पोलीस ठाणे, मालेगांव छावणी पोलीस ठाणे हददीतुन चोरी केल्याचे सांगितले आहे. वरील कारवाईसाठी पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार 1182 मनोज डिंगर, पोलीस नाईक 2104 सचिन गोसावी, पोलीस नाईक 1541 हितेश भामरे, पोलीस नाईक 1011 योगेश मोरे तसेच विशेष पथकातील पोशि 1538 राकेश जाधव, पोशि 2699 राम निसाळ, यांनी कारवाई केली असुन सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे आदेशान्वये पोलीस नाईक 1625 हरीष कोळी हे करीत आहेत.