मालेगाव / शहरात मोहरमच्या निमित्ताने ताबुत, सवारी, आलमपंजे, शेरबाग, धार्मिक वाज असे विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू असुन सदर कार्यक्रम शांततेत साजरा व्हावेत म्हणुन मा. श्री. शहाजी उमाप. पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण यांचे मार्गदर्शनात व मा. श्री. अनिकेत भारती अपर पोलीस अधिक्षक मालेगाव, मा. श्री. तेगबीर सिंग संधु सहायक सहायक पोलीस अधिक्षक मालेगाव शहर उप विभाग यांचे उपस्थितीत मालेगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शहिदो की यादगार, पेरी चौक, मुल्लावाडा, शास्त्री चौक,किल्ला पोलीस ठाणे, जामा मशिद, सरदार चौक, आंबेडकर पुल कॉर्नर, डॉ. बाबासाहे आंबेडकर पुतळा, नियंत्रण कक्ष मालेगाव दरम्यान रूटमार्च घेण्यात आला सदर रूटमार्च मध्ये, पोलीस निरीक्षक सोनवणे. शहर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक आहिरे आयशा नगर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक पाटील पवारवाडी पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक जोंधळे आझादनगर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक शेगर छावणी पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक तायडे किल्ला पोलीस ठाणे, सपोनि रोही रमजानपुरा, सपोनि काळे कॅम्प पोलीस ठाणे. प्रभारी अधिकारी व अंमलदार यांचा शस्त्र साहित्य व बंदोबस्ताचे साधन सामुग्रीसह सहभागी झाले होते.
मालेगाव शहरात मोहरमचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक १५, सहायक पोलीस उपनिरीक्षक १२, पोलीस उप निरीक्षक २५, पोलीस अंमलदार १५०, आर. सी. पी. प्लाटुन ०२, एस आर पी एफ प्लाटुन ०२, होमगार्ड ४५० असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे .
पोलीस दलातर्फे मालेगाव शहरातील जनतेला आवाहन करण्यात येते की, शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन सोशल मिडीयातील कुठलेही संदेश आणि अफवा यांची सत्यता न पडताळता प्रसारित करू नये. अफवा पसरविणारे संदेश प्रसारित करणा-या विरोधात कायदेशिर कडक कारवाई करण्यात येईल .