मालेगाव / मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमाप तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, मालेगांव श्री. अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली श्री. तेगबीर सिंह संधू, सहायक पोलीस अधीक्षक, मालेगांव शहर उपविभाग यांनी व त्यांचे विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोहवा. सचिन धारणकर, पोना. इम्रान सैय्यद, पोकॉ. दिनेश शेरावते, पोकॉ. सचिन बेदाडे, पोकों प्रशांत बागुल यांनी केलेली छापा कारवाई.
१. दि. ०४/०७/२०२३ रोजी मा. सहायक पोलीस अधीक्षक, श्री तेगबीर सिंह संधू, मालेगांव शहर उपविभाग, अतिरीक्त कार्यभार मालेगांव कॅम्प उपविभाग, मालेगांव यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, चंदनपुरी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाचे पाठीमागील वस्तीच्या शेवटी शेताला लागुन एका पत्रयाचे आडोश्याला विनोद जगताप हा त्याचे हस्तका करवी मटका जुगार अंक आकडयावर लोकांकडुन पैसे लावुन घेवुन मटका जुगार खेळत व खेळवित आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेवरून वर नमुद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे राजेंद्र रतन जाधव, वय ५४, रा. चंदनपुरी गांव, खंडेराव मंदिराजवळ, मालेगांव यास जागीच ताब्यात घेण्यात आले असता त्याचेकडे १३,२२०/- रु. रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य साधन मिळुन आले असुन सदर प्रकाराबाबत १) राजेंद्र रतन जाधव, वय ५४, रा. चंदनपुरी गांव, खंडेराव मंदिराजवळ, मालेगांव, २) विनोद लक्ष्मण जगताप, रा. चंदनपुरी मालेगांव व सदर अंक आंकडयांचा उतरा घेणारा ३) रफिक भु-या उर्फ पहेलवान पुर्ण नांव माहित नाही. रा. जुना आझादनगर मालेगांव यांचे विरुद्धात महा. जु. का. क. १२ (अ) प्रमाणे किल्ला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. दि.०५/०७/२०२३ रोजी मा. सहायक पोलीस अधीक्षक, श्री. तेगबीर सिंह संधू, मालेगांव शहर उपविभाग, अतिरीक्त कार्यभार मालेगांव कॅम्प उपविभाग, मालेगांव यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, छावणी पो.स्टे. हद्दीतील मोहन टॉकीज समोर लक्ष्मीवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी सिद्धार्थ रमेश शिरसाठ हा विना परवाना अवैध्यरित्या देशी दारूची विक्री करीत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळालेवरून वर नमुद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम नामे सिध्दार्थ रमेश शिरसाठ, वय- ३३, रा. मोहन टॉकीज समोर लक्ष्मीवाडी, मालेगांव याचे ताब्यात ३९ मॅक डोल्स नं. १ कंपनीचे विस्कीच्या बाटल्या, ०८ ऑफिसर चॉईस ब्ल्यु कंपनीचे विस्कीच्या बाटल्या, १५६ देशी दारू बाटल्या व रोख रक्कम असे एकुण १४,०५५/- रू. किं. च्या मुद्देमालासह मिळुन आल्याने सदर प्रकाराबाबत छावणी पो.स्टे. येथे मुंबई प्रोव्हीशन अॅक्ट ६५ (ख) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.