مشہور خبریں

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई : लाखोंचा मुद्देमाल जप्त.

 


मालेगाव / मा.श्री.डॉ. बी.जी.शेखर पाटील सो.. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उपादन करण्यासाठी नेमणुक केलेल्या पथकाने छापा कारवाई करुन दि. ३०/१०/२०२३ रोजीचे २०.०५ वा. चे सुमारास मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत झोडगे शिवारातील मालेगाव महामार्ग क्र. ३. लगत हॉटेल कृष्णाच्या पाठीमागे पयांचे बोलगत मोकळ्या जागेत इसम नामे १) मनोहर भाऊसाहेब पाटील वय २४ वर्ष रा. नंदाळे ता. जि. धुळे सध्या रा. कृष्णा हॉटेल, झोडगे ता. मालेगाव जि.नाशिक (२) रोहित दादाभाऊ खामकर वय १८ वर्षे ९ महिने रा. गुगळवाड ता. मालेगाव जि.नाशिक (३) गणेश कृष्णा शेलार व १९ वर्ष तामगाव नाशिक (४) विक्रम सुरपाल राठोड वय २५ वर्षे राजडगाव तहसिल बडवाणी वाणी राज्य मध्यप्रदेश या राशी, ग ता.मालेगाव जि.नाशिक (५) विनोद चंद्रसेन कलमे वय ३८ वर्षे रा.मोड ता. खंडवा जि.खंडवा राज्य मध्यप्रदेश सध्या रा.कृष्णा हॉटेल ता.मालेगाव जि.नाशिक (पिकअप क्र. एम.एच.२४ एफ ७८४० वरील चालक) (६) प्रकाश गणेश मरांडी व २४ वर्षे रा. पी.ओ. तसेच मंदी, मरकुंडा, बोकारे राज्य झारखंड ट्रक क्र.एम.एच. १२ व्ही. एफ १३४४ वरील चालक

व पाहिने इसम नाम (७) परसराम भीका गवांदे उर्फ भल्ला शेठ राझोडगे, ता. मालेगाव जि.नाशिक अशांनी संगनमत करून त्यांचे ताब्यातील लोखंड व प्लेस्टो ड्रममध्ये तरवून दिलेल्या अत्याआवश्यक पेट्रोल, डिझेल तसेच बायोडिझेल सदृश्य ज्वालाग्रही द्रव्य याचा साठा करून वेदयमापन अधिकृत नसलेल्या नळीच्या सह्याचाने बाहेर काढून बिना परवाना स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर रित्या कुठलीही सुरक्षात्मक उपाययोजना न करता पेट्रोल, डिझेल तसेच बायोडिझेल सदस्य ज्वालाग्रही द्रव्याचा साठा व त्याचे विक्री साठी लागणारे साहीत्य साधने बेकायदेशीर रित्या स्वतःचे कन्गात बाळगून त्याचे अवैधरित्या विक्री करतांना मिळुन आल्याने तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आग प्रतिबंधक उपाययोजना केली नसल्याने ज्वालाग्रही पदार्थाच्या बाबततीत मानवी जीवीतास धोका होईल असे हयगयीचे वर्तन दिसून आले तसेच अक्र ६. प्रकाश गणेश मरांडी पाने अन्यायाने ट्रक मालकाचा विश्वासघात करून स्थाचे ताब्यात दिलेला ट्रक क्र. एम. एच. १२ को एफ २३x४ मधून बेकायदेशीररित्या डिझेल काढून ते आरोपी क्र. १ ते ५ व पाहिजे आरोपी क्र. ७ यांना स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी ही कृत् करुन विक्री करतांना एकूण २०,१८,७४० रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आले आहे.


सदर बाबत मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७४८ / २०२३ भारतीय दंड संहिता कलम २८५, २८६४०६४०८३३६३४ तसेच अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तजविज असून सदर कारवाई ही मा.श्री. बी.जी.शेखर, मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अमलदार यांनी केली आहे.

Tags

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.