उपरोक्त कारणावरुन आज दि.२१/१०/२०२३ (शनिवार) रोजी मा. श्री शहाजी उमाप पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनिकेत भारती अपर पोलीस अधिक्षक मालेगांव यांचे नेतृत्वाखाली पोलीस विभाग व मनपा मालेगांव विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये मालेगांव शहरातील १) कॅफे मॉम्स मॅजीक (२) सनी आईस्क्रीम, ३) नेस कॅफे, ४) बॅक बेंचर्स, ५) हॅफीनेस पिझा अॅण्ड कॅफे हाउस, ६) हंगर हब कॅफे ॲण्ड रेस्टो हब, ७) रॉयल आईस्क्रीम पार्लर, ८) फास्ट फुड पॉईंट अशा कॅफे / शॉप, आईस्क्रीम पार्लर, पिझा शॉपची तपासणी केली असता तेथे मिळुन आलेल्या मुलांमुलींना अंमली पदार्थाच्या वापराचे दुष्परिणाम समजावुन सांगण्यात आले तसेच कॅफे / शॉपची कागदपत्रे तपासणी संयुक्तरित्या करण्यात आली. बांधकाम /अतिक्रमणाबाबत अनियमियता आढळुन आलेल्या कॅफे / शॉप चालकाविरुध्द कायदेशिर कारवाई करण्याच्या मनपा मालेगांव यांना सुचना देण्यात आल्या आहेत, तसेच कॅफे, हॉटेल, लॉजेस, ढाबे चालकांना अवैध धंदे चालणार नाही याबाबत पोलीसांमार्फत नोटीस देण्यात येत आहेत.
दरम्यान विदयार्थी विदयार्थीनी, तरुण तरुणी यांना कॉफी व आईस्क्रीम निमित्ताने खाजगी जागा उपलब्ध करुन देवुन अशा खाजगी जागेत आक्षेपार्ह व असभ्य वर्तन करण्यास परवानगी दिली म्हणुन नेस कॅफे मोची कॉर्नर मालेगांव याचे चालकाविरुद्ध मालेगांव कॅम्प पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मध्ये श्री अनिकेत भारती अपर पोलीस अधिक्षक मालेगांव, श्री सचिन महाले सहा. उपायुक्त मनपा मालेगांव, श्री रघुनाथ शेगर पोलीस निरीक्षक छावणी पो.स्टे., श्री राजेंद्र भोसले पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस ठाणे, श्री देवेंद्र शिंदे प्रभारी अधिकारी शवाशा मालेगांव, श्री प्रकाश काळे जिविशा मालेगांव, श्री बळवंत बावीस्कर प्रभाग क १ अधिकारी, श्री हरीश डिंबर अतिक्रमण विभाग मनपा मालेगांव, श्री अभॉकर व श्री नजीर भाई नगररचना तसेच मनपा, छावणी, कॅम्प, शवाशा व जिविशा मालेगांव कडील अंमलदार/ स्टाफ यांनी सहभाग घेतला.
मालेगांव पोलीसांकडुन अवैध व्यवसाय विरोधात सातत्याने कारवाई चालु असुन ती यापुढे सदैव सुरु राहील. अवैध व्यवसायासंदर्भाने नागरिकांना काही माहिती असल्यास त्यांनी ती नाशिक ग्रामिण पोलीसांच्या हेल्प लाईन क ६२६२ (२५) ६३६३ यावर दयावी, माहिती देणा-यास त्याचे नाव देखिल विचारण्यात येणार नाहीत. नाशिक ग्रामिण पोलीसांच्या अवैध व्यवसाय विरोधी कारवाईस नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक श्री शहाजी उमाप आणि अपर पोलीस अधिक्षक श्री अनिकेत भारती यांनी केले आहे.