मालेगाव : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ मालेगाव आगारात दोन नवीन BS6 मॉडेल च्या हिरकणी बसेस (निमआराम) मालेगावकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.*
अत्याधुनिक तंत्रज्ञान, पुशबॅक सीट्स, मोबाईल चार्जिंग, तसेच भरपूर स्पेस असलेल्या बसेस मालेगाव आगारात दाखल झाल्या आहेत काही दिवसांपूर्वी मालेगावला एकूण नवीन BS6 मॉडेल च्या 10 लालपरी बसेस एसटी प्रशासन कडून प्रवाशांच्या सेवेसाठी मिळाल्या होत्या.
तरी मालेगावकरांनी मालेगाव ते पुणे जाताना या नवीन बससेवेचा लाभ घ्यावा. 1)मालेगाव ते पुणे संगमनेर मार्गे वेळ - दुपारी 13:30 वाजता. प्रवास दर फुल तिकीट - 580/-, हाफ तिकीट- 290/- 2) मालेगाव ते पुणे अहमदनगर मार्गे वेळ रात्री 20:30 वाजता. प्रवास दर फुल तिकीट- 595/- हाफ तिकीट भाडे 295/- इत्यादी आहे
सदर बसलाअमृत जेष्ठ योजना व महिला सन्मान योजना या सवलती लागू आहेत तरी मालेगाव शहरातील व परिसरातील नागरिकांनी या बस सेवेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान मालेगाव एसटी आगार तर्फे करण्यात येत आहे..