मालेगाव / शहीद पोलीस अधिकारी /अंमलदारांबाबत सर्वमालेगाव सामान्य जनतेमध्ये संवेदनशिलता निर्माण व्हावी व त्यांच्या मनात शहीद पोलीसांच्या हौतात्म्याची जाणिव आणि शहीद पोलीसांच्या कुटुंबीयाबददल आत्मीयता निर्माण व्हावी, या हेतुने पोलिस अधिकारी/अंमलदार शहीद झाल्याच्या घटना बाबत जनतेस माहिती होणे आवश्यक आहे. पोलीस स्मृती दिन व राष्ट्रीय एकता दिनाचे निमित्ताने दि. २१/१०/२०२३ ते दि. ३१/१०/२०२३ रोजीचे दरम्यान नाशिक ग्रामिण घटकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.३१/१०/२०२३ रोजी मालेगाव शहरात सकाळी ०६.३० वा. पोलीस नियंत्रण कक्ष मालेगांव येथे एकता दौड (५ कि.मी.) चे आयोजन मा. पोलीस अधिक्षक श्री. शहाजी उमाप, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पुष्कराज सूर्यवंशी मालेगांव ग्रामीण उपविभाग, अतिरीक्त कार्यभार मालेगांव शहर उपविभाग यांनी केले आहे.
एकता दौड (मॅरेथॉन) मध्ये पुरुष-महीला यांना सहभाग घेण्यासाठी दि.३०/१०/२०२३ रोजीचे दुपारी ०३.०० वा. पर्यंत https://forms.gle/e3zp63858ibCTjOm8 या गुगल लिंकद्वारे नाव नोंदणी करता येईल. एकता दौड मध्ये पुरुष व महिला यांचे स्वतंत्र दोन गट करण्यात आले आहे, फक्त प्रथम ५०० धावपटुनांच प्रमाणपत्र देण्यात येणारे आहे, स्पर्धे करीता वयोगट पुढील प्रमाणे ( १४ वर्ष ते २५ वर्ष ) (२६ वर्षा पासुन पुढे) असे गट करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील प्रथम ०३ विजेत्यांना मेडल दिले जातील. दि.३०/१०/२००९ च्या नंतर जन्म असलेल्या स्पर्धकांनी भाग घेवु नये. सदर स्पर्धेचा मार्ग सुरूवात पोलीस नियंत्रण कक्ष मालेगांव येथुन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुल संगमेश्वर मार्गे महात्मा फुले पुतळा - सटाणा रोड अहिंसा सर्कल - ६० फुटी रोड - एकात्मता चौक कॅम्प रोड मार्गे मोसमपुल - छ. शिवाजी महाराज पुतळा - नविन बस स्थानक - ए.टी.टी. हायस्कुल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - पोलीस नियंत्रण कक्ष मालेगांव असा ५ कि.मी. चा मार्ग एकता दौड करीता नियोजीत करण्यात आला आहे. -
तरी मालेगांव शहरातील जास्तीत जास्त पुरुष व महिला यांना एकता दौड मध्ये सहभाग घेण्यासाठी नाशिक ग्रामिण पोलीस दलातर्फे आव्हान करण्यात येत आहे.
संपर्कासाठी क्रमांक -
१. श्री. रियाज अन्सारी :- ९३७२७१०७८६
२. श्री. नितीन खैरनार :- ९८९०४३०५७४
३. अन्सारी शाहिद अख्तर :- ८७८८२८९६५१