مشہور خبریں

*पवारवाडी पोलिसांनी एकाच दिवसात ३ मोठ्या कारवाया , संशयितांकडून ९,३७,००० रुपयांचे गुरे, गुटखा आणि चारचाकी वाहन जप्त, ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल*

मालेगाव / नाशिक ग्रामीण जिल्हयातील मालेगाव शहरातील अवैध धंदयावर कारवाई करुन त्याचेवर प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनूषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबिर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सिध्दार्थ बरवाल यांनी अवैध धंददयांची माहिती घेवून पवारवाडी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री राहुल खताळ यांना छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार दि. १९/०९/२०२५ रोजी पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल खताळ यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे शेख माजीद, शेख अर्शद रा. कमालपुरा हे पिकअप गाडी मध्ये गोवंश जनावरे आणणार आहे त्यानुसार छापा कारवाई नियोजन करुन सकाळी ०७/०० वा फार्मशी नगर रोडवर येणारी पिकअप क. एम एच ०४ ई एल ४९३५ हीस पकडून त्यात ०२ खिलारी गोवंश जनावरे असे एकूण ३,७५,००० रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करुन पवारवाडी पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. २४१/२०२५ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला आहे

तसेच दुसरी गोपणीय माहिती आधारे आरोपी नामे आसिफ वायरमन रा. गुलशेर नगर हा त्याचे घरात गोवंश हत्या बंदी असतांना गोवंश मास विक्री करत असल्याची बातमी मिळाल्याने त्याचेवर छापा कारवाई केली असता त्याचे घराजवळ चारचाकी मॅक्सीमा गाडीत ८४५ किलो गोवंश मास, वजन काटा असा एकूण १,८७,५०० रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने त्याचेवर गोवंश हत्या बंदी कायदयान्वये पवारवाडी पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. २४३/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच तिसरी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे अन्सारी अबुबकर रिजवान हा छोटया चारचाकी गाडीमध्ये बाहेर गावाहून मालेगाव शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विकी करता आणणार आहे बाबत माहीती मिळाल्याने त्याचेवर छापा कारवाई नियोजन करुन त्यास ताब्यात घेवून त्याचे गाडीत २,२५,००० गुटखा व छोटी चारचाकी गाडी क. एम एच ०१ सी.व्हि. ३२८३ टाटा कंपनीची असा एकूण ३,७५,०००/- रुपये किमंतीचा मुददेमाल मिळून आल्याने त्याचेवर पवारवाडी पोलीस स्टेशन कडील गु.र.नं. २४५/२०२५ बी.एन.एस. क. १२३,२७४, २७५,२२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबिर सिंह संधू तसेच मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सिध्दार्थ बरवाल यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोनि श्री. राहुल खताळ, सपोनि किरण पाटील, पोउपनिरी. पवन सुपनर, पो.हवा. राकेश उबाळे, पो.हवा. संतोष सांगळे, निलेश निकम, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड यांचे पथकाने ०२ गोवंश व ०१ गुटखा असे एकुण ०३ गुन्हे दाखल करुन आणुन ९,३७,०००/- रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करुन कामगिरी केली आहे.

ایک تبصرہ شائع کریں

0 تبصرے
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.